logo

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुकेश श्रीकृष्ण धावडे
दिनांक, 14 प्रतिनिधी
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज रविवार, दिनांक १४ एप्रिल, २०२४ रोजी विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) कार्यभार जितेंद्र भोळे, अवर सचिव विजय कोमटवार, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती यांचे विशेष कार्य अधिकारी अविनाश रणखांब व डॉ. संतोष उडतेवार, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

2
367 views